दिनांक 2 जून, 2014 च्या महाराष्ट्र टाइम्स मधे मोदी सरकार बद्दल चार लेख आहेत. या सर्व लेखांमधे विरोधी सुर पूर्णत: दिसत नाही तरीही तोलून मापून टिका केलेली दिसते. माझ्या मागच्या लेखात लिहाल्या प्रमाणे छाया दातार यांच्या लेखात जसा पूर्ण विरोधी सुर होता तसा या लेखांत नसला तरी सुरुवात झाली आहे असे म्हणता येईल. आपण एकेक लेख घेऊ या.
आजकाल मटात अग्रलेखाचे दोन भाग असतात. दोन्ही अग्रलेख वेगवेगळ्या विषयावर असतात. पहिल्या भागातील अग्रलेखात राज ठाकारेंवर उखडले आहेत तर दुसऱ्या भागात प्रकाश जावडेकर यांच्यावर. आपण दुसऱ्या अग्रलेखा बद्दल बोलणार आहोत. या अग्रलेखाचे शिर्षक आहे ' ज्याचा त्याचा नि:पक्षपात'. यांत नवे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी इकोनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रसारमाध्यमांना नि:पक्षपाती राहण्याचा सल्ला दिला आहे, याबद्दल लिहले आहे.
.jpg)
यांत सरळसरळ लिहले आहे की मोदींच्या विजयाला प्रसारमाध्यमांनी हातभार लावला आहे या बद्दल बहुतांश राजकीय तज्ञांचे एकमत होते. आदर्श पासून ते कोलगेट पर्यंत सगळे घोटाळे प्रसारमाध्यमांनी उघड केले. तसेच यूपीए-2 सरकार वर कठोर टिका केली. अग्रलेखात कॉंग्रेसचे नाव न घेता यूपीए-2 सरकार असे म्हंटले आहे. घोटाळे उघड केल्यामुळे तसेच टिका केल्यामुळे कॉंग्रेसचे नेते दुखावले होते. म्हणजे संपादक महोदय कॉंग्रेसला न दुखवन्याची काळजी घेत आहेत आणि 'कॉंग्रेसचे सरकार' किंवा 'कॉंग्रेस प्रणीत यूपीए-2 चे सरकार' न म्हणता फक्त यूपीए-2 सरकार म्हणतात. तसेच टिका करताना एनडीए-2 चे सरकार न म्हणता भाजप किंवा नुसते सरकार असे का म्हणतात.
आता इथून पुढे चांगले काम केले तर एनडीए-2 चे सरकार आणि टिका करायची झाल्यास 'भाजप सरकार' किंवा 'मोदी सरकार' हे वारंवार घडत राहिल्यास आश्चर्य वाटणार नाही. लक्ष ठेवा. (कारण इथून पुढे कॉंग्रेसला पुन्हा गादीवर बसवण्यासाठी हे करावेच लागणार आहे आणि त्याची सुरुवात झाली आहे) तसे पाहिले तर मटाच्या नाकाला मिरच्या झोंबन्याचे कारण नव्हते. पण अशोक चव्हाण यांच्या पेड न्यूज़ प्रकरणात दोशी असलेल्यांकडून दूसरी काय अपेक्षा करणार !
दूसरा लेख विचार या सदराखाली सुनील चावके यांनी लिहला आहे.

त्याचे नाव आहे 'मोदी सरकारच्या कार्यक्षमतेची कसोटी'. सुनील चावके तसे नि:पक्षपाती लिहतात. याचा अनुभव त्यांच्या मागील लेखावरून येतो. तरीही त्यांनी भाजप आणि मोदी सरकार असाच उल्लेख प्रत्येक ठिकाणी केला आहे. हे रालोआचे (NDA) सरकार आहे हे माहित नाही काय?
तीसरा लेख आहे 'धावते जग' मधे 'शत्रुघ्न सिन्हांचे टोले'. भाजपमध्ये वयाची पंच्या- हत्तरी ओलांडलेल्यां करिता वानप्रस्थाश्रम हाच मार्ग राहिल, या पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या अलिखित नियमाविरुद्ध शत्रुघ्न सिन्हा यांनी दंड थोपटले आहेत.
असे सगळे लिहून अडवाणी तसेच जोशी यांना मंत्रिपदे द्यायला पाहिजे होते असे सांगुन वयोवृद्धांची प्रशंषा केली आहे. तसेच सिन्हा इतक्या वेळा निवडून येवुनहि त्यांना मंत्रिपद दिले नाही यावर टिका केली आहे. हा लेख हे दाखविण्यासाठी आहेकी भाजप मधे आता भांडणे सुरु झाली आहेत. आणि मोदी चुकीचे वागत आहेत. सगळे जग तरुण राजकारण करनाऱ्या लोकांना पाठिंबा देत असताना मटा वयोवृद्धांची बाजु घेत आहे यात आश्चर्य नाही काय?
वरील सर्व लेखांवरून असा निष्कर्ष काढता येईल की मटा नि:पक्षपाती नाही अणि पूर्णत: कॉंग्रेसच्या आहारी गेलेला आहे. अभी तो ये शुरुवात है। पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा