दिनांक: भारतीय सौर १८ वैशाख शके १९३७,
८ मे २०१५
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती सारी सत्ता केंद्रित झाली आहे.' असा गंभीर (?) आरोप बुधवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला. 'एक व्यक्ती आणि काही निवडक लोकांचे हे सरकार, आठ महिन्यांपासून स्वतःला चौकशीपासून वाचवण्यासाठी माहिती आयुक्तांची नेमणूक करण्याचे टाळत आहे.' अशी 'घणाघाती' (?) टीका सोनियांनी केली.
-मटा बातमी
७.४.२०१५
वा! सोनियाबाई वा! काय गंभीर आरोप आपण केला आहे. पण याची सुरूवात कोणी केली होती. अहो बाई! सार्या जगाला माहित आहे की काँग्रेसच्या काळात सत्ता कुठे केंद्रित झाली होती. टाइम मासिकाने सुद्धा तुम्हाला जगातील शक्तीशाली महिलांच्या यादीत स्थान दिले होते. ते कसे काय? कसले गंभीर (पुचाट!) आरोप करता? अहो! त्या आमच्या पंतप्रधान मनमोहन सिंगांना तुम्ही फक्त 'सह्याजीराव' करून ठेवले होते. एका वर्षातच त्याचा विसर पडला काय? स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसर्याचे पाहायचे वाकून -सोडून द्या असे वागणे. पटेल असे काहीतरी बोला. उगीच मगरीचे अश्रु नका ढाळू. कोणीही लक्ष देणार नाही अशाने तुमच्याकडे. मनमोहन सिंगांना नुसते 'आधुनिक वेठबिगार' बणवून ठेवले होते तुम्ही आणि तुमच्या त्या 'चंपक' मुलाने. पटेल, रुचेल असे काहीतरी बोला बाई. नाहीतर हत्ती चाललाय ऐटीत आणि तुम्ही आपले बसलाय..... बघा पटले तर. मला काय? मला एक सांगा की माहिती आयुक्तांची नेमणूक केली तर कोणाच्या जास्त चौकशा होतील? तुमच्या सरकारच्या की भाजप सरकारच्या? ते तर आत्ताच वर्षापूर्वी आलेत. 'झाकली मुठ सव्वा लाखाची' असते बाई. ती तशीच राहू द्या. कशाला 'खाजून खाजून अवधान' आणायचा प्रयत्न करताय. आमच्या पवार साहेबांकडून शिका काहीतरी. त्यांचं बघा कसं असतं. 'चित भी मेरी, पट भी मेरी.' बाकी तुम्ही समजदार आहात. लोक हसतील मलाच, तुम्हाला इतके समजावत बसलो तर. रामराम!
या मटाला पण काहीच कळत नाही. अहो कशालाही काहीही बोलता? 'गंभीर आरोप' काय? घणाघाती टीका काय? यामुळे तुम्हाला तरी कोणी गंभीरपणे घेईल काय? घण म्हणजे हातोडा. तोही मोठा हातोडा. मला तर ही स्मार्टफोनवर मारलेली टिचकी पण नाही वाटत. वापरा पण, तुम्ही वापरा. मराठी भाषेत शब्दांना काहीच कमतरता नाही. वापरायचे ते शब्द वापरा. भारीभारी शब्द वापरा. परिणाम शुन्यच आहे.
आपला हितचिंतक,
-रामदास पवार
अंबरनाथ
(८.५.२०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा